अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानिक रा. सुं.बिडकर महाविद्यालयात वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. शंकर बोंडे यांचा सेवानिवृत्ती समारोह आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाची सुरुवात ग्रामीण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी स्वर्गीय कृष्णरावजी झोटिंग पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. व डॉ. शंकर बोंडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक क्रीडा विभाग प्रमुख डॉ. बलराज अवचट हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. शंकर बोंडे यांचे सेवा काळातील अनुभव, वाणिज्य विभागासाठी केलेल्या कार्याचा मागोवा घेतला. तसेच त्यांना सेवानिवृत्ती नंतर चांगले आरोग्य लाभो ही सदिच्छा व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर वरिष्ठ प्राध्यापक समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजू निखाडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. सुनील अल्लेवार उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात डॉ. शरद विहीरकर, डॉ. रवींद्र महाकाळे, डॉ. कमलकिशोर इंगोले, डॉ. कमलाकर नवघरे, डॉ. मनीषा रिठे, प्रा. सुनील अल्लेवार, श्री. चंद्रशेखर कुटे इत्यादिंनी आपले विचार व्यक्त केले. व प्रा. डॉ. शंकर बोंडे यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. गजानन ठक यांनी तर प्रास्ताविक प्रा.विकास बेले ने केले. आभार प्रदर्शन डॉक्टर अनिल बाभळे यांनी मानले. या कार्यक्रमाकरिता वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय आणि एमसीव्हीसी चे सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.