उमेश इंगळे, अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- अशोका फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शुभम तिडके यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष कुष्णा अंधारे यांच्या मार्गदर्शनात पक्षामध्ये प्रवेश केला.
शुभम तिकडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) गटाच्या ग्रामीण जिल्हा चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्ती ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांच्या मार्गदर्शनात मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली. असुन बाळापूर तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपरिषद तथा विधानसभा निवडणुकीत बाळापूर तालुक्यात चुरशीची लढत होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार यावेळी शुभम तिडके यांनी केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुष्णा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनात अकोला जिह्यात बळकट होत असून बाळापूर विधानसभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आमदार करण्यासाठी शुभम तिडके यांनी आपल्या सहकार्यानसह कंबर कसली आहे. यावेळी बाळापूर तालुक्यातील तसेच अकोला जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348