अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला, दि. 6:- धूम्रपान करणाऱ्यांवर व्हावी कारवाई सार्वजनिक ठिकाणी शासकीय, निमशासकीय, खासगी, शासकीय संस्था व कार्यालयातील कामाची जागा, उपाहारगृहे, शाळा व महाविद्यालये यांचा समावेश होतो, तेथे नागरिकांच्या संरक्षणाकरिता सिगारेट, तंबाखू व तंबाखूजन्य इतर उत्पादने प्रतिबंधक कायदा २००३ च्या कलम ४ अन्वये तंबाखू खाणे, थुंकणे, धूम्रपान करण्यास प्रतिबंध आहे. शासकीय इमारतीच्या परिसरामध्ये धूम्रपान आणि थुंकणे हा दंडात्मक गुन्हा आहे.
भाविच्या कलम २६८ नुसार आजूबाजूस राहणाऱ्या लोकांना नुकसान, अटकाव, धोका किंवा त्रास होतो, अशी कोणतीही कृती करणारी व्यक्ती सार्वजनिक उपद्रवाबद्दल दोषी राहील, असे गृहीत धरून कारवाई करावी. सर्व शासकीय व निमशाकिय कार्यालयात तपासणी पथक गठीत करुन तपासणी करावी. व शासनाच्या आदेशाचे काटेकोर पणे पालन व अमलबजावणी करावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता व युवा व्यसनमुक्ती जनआंदोलन समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक उमेश सुरेशराव इंगळे यांनी दि. २२/१२/२०२३ रोजी जिल्हाधिकारी यांना सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांत तंबाखू प्रतिबंध कायद्याचे पालन करण्याचे आदेश देण्यात यावे अशी तक्रार करून मागणी केली होती.
त्यांच्या मागणीची दखल घेत सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ कायद्याचे काटेकोर पालन व्हावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. तसे पत्र सर्व कार्यालयांना निर्गमित करण्यात आले आहे.
शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये व परिसर, उपाहारगृहे आदी सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणे, धुम्रपान करणे, थुंकण्यास कायद्यान्वये प्रतिबंध आहे. त्यामुळे सर्व कार्यालये तंबाखूमुक्त घोषित करून नियमांचे उल्लंघन करणा-यांवर दंडात्मक कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी असुन सामाजिक युवा व्यसनमुक्ती जनआंदोलन समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांच्या मागणीला यश आले आहे.