उषाताई कांबळे, प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज विश्रांतवाडी दि.07 फेब्रुवारी:- त्यागमुर्ती माता रमाई डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 वी जयंती बहुजन हिताय मुलींचे वसतिगृह विश्रांतवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सकाळी 9 वाजता बहुजन हिताय मुलींचे वसतिगृह विश्रांतवाडी येथे विद्यार्थिनींना आवश्यक शैक्षणिक साहित्य देऊन स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणे यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या सुरवातीला त्यागमुर्ती माता रमाई आणि डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. माईंनी भक्कम पाठबळ दिले म्हणूनच महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रोन्नतीत, सामाजिक कार्यात अतुल्य योगदान देता आलं. त्यांचं जीवन हे आजच्या स्त्रीशक्तीसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीमध्ये व कार्यात रमाई यांचा त्याग व परिश्रम यांचे विस्मरण होता कामा नये. असे यावेळी म्हणाले त्यानंतर विद्यार्थिनींनी रमाईच्या जीवनावर गाणी गायली आणि माता रमाई यांना अभिवादन करून माहिती दिली.