नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा उपक्रम.
संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी
मोबा. न 9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 8 फेब्रुवारी:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या राजुरा तालुका महिला संघटिका संगीता पाचघरे यांनी आपला वाढदिवसानिमित्याने स्वामी विवेकानंद सांस्कृतिक सभागृह राजुरा येथे वृक्षारोपण करून साजरा केला. यावेळी बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, मोहनदास मेश्राम, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, सुनैना तांबेकर, नागपूर विभाग महिला उपाध्यक्षा, नरेंद्र देशकर, उपाध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा, बाळा गोहकर, विलास चापले, बाबुराव झटाले, दिलीप लंगडे, छाया लंगडे, वनिता उराडे , पुष्पा वासाडे , प्रविना हरणे , प्रवीण देशकर, सातपुते , तेलंग , संध्या कडू, रजनी तोडे, अर्चना दडगल, सुवर्णा बेले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे पदाधिकारी, संघटक हे सामाजिक दायित्वातून, पर्यावरण संवर्धन, मानवता विकासाचे विविध उपक्रम घेऊन वाढदिवस साजरे करीत असतात हे विशेष. यावेळी सांगिता पाचघरे यांचे पती नंदकुमार पाचघरे यांनी गीतगायन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहनदास मेश्राम यांनी केले. यावेळी पतंजली योग समिती, लोकमत सखी मंच, मॉर्निग ग्रुप, आदींनी संगीता पाचघरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.