निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा:- तालुक्यातील भारोसा येथील पदावली भजन मंडळ भारोसा ग्रामस्थांनी शनिवार ता. १० ते रविवार ता.११ दरम्यान पदावली भजनाची स्पर्धा दोनदिवशीय आयोजन केले आहे. या पदावली भजन स्पर्धेत पाहिल 15000, दुसर 12000, तिसर 10000,चौथ 8000, पाचव 7000,सहाव 6000,सातव 5000, आठव 4000, नव 3000, दहाव 2000 रुपये रोख देऊन विजेत्या पदावली भजन मांडलास सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय वैयक्तिक बक्षिसात संपुर्ण स्पर्धेत उत्कृष्ट ढोलक वादक 500 ,उत्कृष्ट पद 500 उत्कृष्ट गौवळ 500 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन राजुरा विधानसभा सभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते शनिवारला (ता. १०) सांयकाळी ६ वाजता होणार असुन याप्रसंगी अध्यक्ष विजय बावणे संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर एकनाथ गोखरे सामाजिक कार्यकर्ता भारोसा तसेच ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आणि समस्त भारोसा ग्रामवाशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

