अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
मोबा नं.-९८२२७२४१३६
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ८ फेब्रुवारी:- स्थानिक नगर परिषद येथील सन २०२३- २४ ते २०२६-२७ या कालावधीसाठी सुरू केलेल्या चतुर्थवार्षिक कर आकारणीच्या प्रक्रियेस पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत स्थगिती देण्याची मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सावनेर शहर भाजप व रासप तर्फे करण्यात आली आहे.
सावनेर पालिकेतील प्रशासकांनी ५ जुलै २०२२ रोजी ठराव क्रमांक ८ नुसार सन.२०२३-२४ ते २०२६-२७ चतुर्थ वार्षिक मालमत्ता कराचे पूर्णमूल्यांकन करण्यास मान्यता देऊन आर.एस. कन्स्ट्रक्शन या खाजगी कंपनीला कंत्राट देऊन पूर्णमूल्यांकन सुरू केले होते.नोव्हेंबर २०२२ मध्ये सर्वपक्षीय धरणे आंदोलनानंतर ९/१२/२०२२ रोजी मुख्यअधिकारी (प्रशासक) यांनी लेखी आश्वासन देऊन वाढीव मागणी बिले निवडणुकी नंतर नवीन बॉडीच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. परंतु प्रशासकांनी नुकतेच शहरातील मालमत्ता धारकांना डिमांड (मागणी बिल) नोटीस देण्यात आल्या.खाजगी कंपनीने केलेला सर्वे हा पक्षपाती व दोषपूर्ण आहे. परंतु एकदा डिमांड नोटीस दिल्यानंतर अपील करणे हा एकमेव मार्ग असतो म्हणून प्रत्येक नागरिकांनी उजर/आक्षेप घेणे आवश्यक आहे.
सध्याच्या स्थितीत सावनेर पालिकेमध्ये प्रशासक राज आहे व अपील समितीमध्ये उपजिल्हाधिकारी पेक्षा कमी नसलेल्या अधिकाऱ्यांसह नगरपरिषद अध्यक्ष,मुख्य अधिकारी, सभापती महिला व बालकल्याण व विरोधी पक्ष नेता हे ५ जण समितीचे सदस्य असतात.पालिकेत प्रशासकिय राज असल्याने निवडणुकीपर्यंत अपील समिती गठीत होऊ शकत नसल्याने सुनावणी कशी करणार? अश्या स्थितीत सावनेर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत या चतुर्थ वार्षिक कर आकारणी प्रक्रियेस स्थगिती प्रदान करण्याचे अधिकार आता फक्त नी फक्त राज्य सरकारलाच आहे.नगरविकास खाते हे एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्यामुळे भारतीय जनता पार्टी व रासप यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांना रामरावजी मोवाडे सचिव भाजप नागपूर जिल्हा, अँड.अरविंद लोधी माजी नगराध्यक्ष सावनेऱ,मंदार मंगळे ता.अध्यक्ष सावनेर भाजप व राजुभाऊ घुगल सावनेर शहर अध्यक्ष भाजपा यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री कार्यालयाचे कामकाज पाहणारे निवासी उपजिल्हाधिकारी सचिन गोसावी नागपुर यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी तुषार उमाटे, सुजित बागडे, रवींद्र ठाकूर, सचिन उइके, आशिष मानकर, दिवाकर नारेकर, बाल्या ताजने, बापू सुरे, राजू भुजाडे, शालिक मोहतुरे इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.