उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- पोलीस दलातून एक माहिती समोर आली होती. मनोज जरांगे पाटील यांची जालना ते मुंबई संभाव्य पायदळ यात्रा आणि त्यानंतर श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा या काळात दि.20 जानेवरी ते 28 जानेवारी पावेतो सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या रजा रद्द केल्या होत्या. या काळात अति महत्वाच्या बंदोबस्तात गैरहजर राहनाऱ्या एपीआय मनोज दशरथ लांडगे यांच्यावर गैरवर्तवणूकिचा ठपका ठेवत शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
सविस्तर वृत्त असे की, आदेश क्र. पोअअ/विचौ/२५-क/कसुरी/निलंबन-सपोनि-लांडगे/२०२४/ १३८८, दिनांक ३१.०१.२०२४ अन्वये सपोनि मनोज लांडगे यांना सि.एम.एस. सेल, अकोला येथुन त्यांनी अति महत्वाचे बंदोबस्त चे कालावधी मध्ये किरकोळ रजेवर असतांना रुग्न निवेदन करुन वैदयकिय उपचाराचे कागदपत्र सादर न करता परस्पर फोनव्दारे नियंत्रण कक्ष येथे माहिती दिली. याबाबत वरिष्ठांना कोणत्याही प्रकारे कळविण्यात आले नाही म्हणून त्यांचे गैरवर्तणुकी बददल निलंबित करण्यात येवुन त्यांना नियंत्रण कक्ष, अकोला हे मुख्यालय देण्यात आले होते. त्याबाबत निलंबित सहायक पोलीस निरीक्षक यांनी दिनांक ०५.०२.२०२४ रोजी दिलेल्या विनंती अर्जानुसार सकारात्मक दृष्टीकोन ठेवून व कमी असलेले मनुष्यबळ लक्षात घेता या आदेशाच्या दिनांकापासुन निलंबनातून मुक्त करण्यात येत आहे.पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या वर राजकीय दबाव आणून एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यावर चुकीचे आरोप करण्यात येऊन नाहक बदनामी करण्यात आली होती. एकाच दिवसात निलंबित करून निलबन रद्द केल्या मुळे या निलबंनामागे राजकीय व्यक्तीचा हात तर नाही ना अशी चर्चा पोलीस तर्तुळात चांगलीच रंगली रंगली आहे.