अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील पॅसिफिक क्रिकेट अकादमीचा खेळाडू विराट कैलाश भोयर याची 14 वर्ष वयोगटातील शालेय महाराष्ट्र क्रिकेट संघात नुकतीच निवड झाल्याने हिंगणघाट क्रीडा श्रेत्रात आपला ठसा उमटवला आहे.
विराट भोयर हा पॅसिफिक क्रिकेट क्लब हिंगणघाट च्या सेंट जॉन्स स्कूलचा खेळाडू व NCA नागपूर व तसेच VCA अन.14 कॅम्प सांभाव्य संघात सराव सामने खेळलेला आहे. या महिण्याच्या शेवटच्या आठवड्यात शालेय राज्य स्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेत स्थान मिळवणारा विराट भोयर हा नागपूर विभागातून एकमेव खेळाडू आहे. हे आपल्या हिंगणघाट साठी मान उंचवणारा क्षण आहे. गेल्या कित्येक वर्षापासून हिंगणघाटात अनेक खेळाडू घडताना दिसत आहे.
विराट भोयर याच्या निवडीबद्दल त्याने त्याचे प्रशिक्षक मन्नान ऐतबार अली, डॉ. निर्मेश कोठारी, योगेश यादव, गजू गौरकार, बंटी वाघमारे, समीर कुरेशी, वैभव कळंबे, व पॅसिफिक क्रिकेट अकादमीचे संचालक प्रशांत मोहता व आई-वडील यांना श्रेय दिले.
या निवडीबद्दल विराट भोयर ने पॅसिफिक क्रिकेट क्लब चे सर्व खेळाडू व तसेच सर्व प्रशिक्षक यांचे धन्यवाद मानले. विराट भोयर ची महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल हिंगणघाटच्या सर्व खेळाडूंमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

