वाळू डेपोमुळे चोरीला आळा बसेल व सर्वसामान्यांना स्वस्तात वाळू मिळेल : सोनाली जोंधळे, तहसीलदार मंठा
रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्हातील मंठा तालुक्यातील तळणी परिसरातील पूर्ण नदी काठीच्या सासखेडा येथील पहिल्या वाळू विक्री डेपो चा शुभारंभ म्हणतात तहसीलदार सोनाली जोंधळे यांच्या हस्ते दिनांक 10 फेब्रुवारी शनिवारी रोजी करण्यात आला. या वाळू विक्री डेपोमुळे सर्वसामान्यांना स्वस्तात वाळू मिळणार आहे.
मंठा तालुक्यातील पूर्ण नदी काठीच्या सासखेडा, टाकळखोपा, तळणी या विक्री डेपो सुरू होणार आहे. यापैकी सास खेड्यातील पहिल्या वाळू विक्री डेपोचा शनिवारी सकाळी 11 वाजता मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तलाठी नितीन चिंचोले, राजेभाऊ तांबे, राहुल दिघे, बंडू अण्णा बेंद्रे, सरपंच अजय जाधव, लक्ष्मण जाधव, मुरलीधर देशपांडे, शिवाजी खंदारे, अर्चना राऊत, अमित तांबे बंटी तांबे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.