महोत्सवात महिलांन करिता विविध स्पर्धेचे आयोजन.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा महिला आघाडीच्या महिला महोत्सवात शेकडो महिलांनी सहभाग नोंदविला.
शहरातील नंदोरी रोडवरील साई सभागृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा महिला आघाडीच्या वतीने महिला महोत्सव व महिलांकरिता विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पूर्व विदर्भ अध्यक्षा डॉ.सुरेखाताई देशमुख या होत्या. उद्घाटक महिला जिल्हाध्यक्ष ज्योतीताई देशमुख तर प्रमुख पाहुणे सौ.स्वाती अतुल वांदिले, जिल्हा कार्यकारी अध्यक्षा सौ.विनाताई दाते, जिल्हा उपाध्यक्ष शारदाताई केने, युवती जिल्हाध्यक्ष डॉ.माधवी देशमुख या उपस्थित होत्या.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरानी कार्यक्रमाला मार्गदर्शन केले. महिलांनकरिता वेशभूषा स्पर्धा, ऐकलं नृत्य, उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, चमचा-निंबु स्पर्धा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेकरिता परीक्षक सौ ममता काकडे, सौ.ज्योती हेमने, सौ दिशा भुते या होत्या.ऐकलं नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तेजस्विनी तर द्वितीय दिपाली रंगारी, मोनू उगेमुगे यांनी मिळवला. वेशभूषा स्पर्धेमध्ये प्रथम निता धांदे, द्वितीय वनिता सज्जनवार यांनी मिळवला.उखाणे स्पर्धेमध्ये प्रथम भारती मोरे द्वितीय कोमल बोडे, संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये प्रथम रेश्मा सावरकर, द्वितीय पायल ठाकूर यांनी मिळवला. चमचा निंबु स्पर्धेमध्ये क्रमांक पायल ठाकूर,द्वितीय जया महाजन यांनी मिळवला…
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिमा तिवारी यांनी केले.संचालन ज्योती कोचाडे तर आभार प्रदर्शन सुचिता सातपुते यांनी केले…
आयोजनासाठी शहर कार्याध्यक्ष सिमा तिवारी, शहराध्यक्ष मृणाल रिठे,जिल्हा उपाध्यक्ष शितल तिवारी, जिल्हा सहसचीव सुचिता सातपुते,जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभुलकर, विधानसभा अध्यक्ष निता गजबे, उपाध्यक्ष विद्या गिरी, तालुका अध्यक्षा शगुप्ता शेख, उपाध्यक्ष मिनाक्षी धाकने,तालुका संघटक वैशाली लोखंडे, सचिव अर्चना नांदूरकर,शहर सरचिटणीस सविता गिरी, शहर उपाध्यक्ष दिपाली रंगारी,प्रश्चीम शहर उपाध्यक्ष अंकिता गहलोत,भारती घूंगरूड, आचल वकील, रजनी महाकाळे,सोनू बाभुलकर, गीता मेश्राम,सविता गहलोत,सुरेखा घोडे, सुनीता तामगाडगे, नितु मेश्राम, वर्षा सोनटक्के, आशा कोसुरकर, सुवर्णा पेंदोर आदींनी परिश्रम घेतले..