समाजवादी पार्टी महिला सभा जिल्हा संघटक सीमा डोंगरे यांच्या नैत्रुत्वात देसाईगंज नगर पालिकेला धडक.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देसाईगंज:- समाजवादी पार्टी महिला सभेच्या वतीने आज देसाईगंज येथील जवाहर वार्ड या ठिकाणी होत असलेल्या गढूळ पाणी पुरवठ्याबद्दल देसाईगंज नगर पालिकेला निवेदन देण्यात आले.
शहरातील जवाहर वार्ड येथील सरकारी दवाखाना रोडच्या समोरील भागात अनेक दिवसांपासून नळ वाहिकेतुन गढूळ पाणी पुरवठा होत आहे या मुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. येथील लोंकानमध्ये डायरियाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ बघायला मिळत आहे. सदर नळ वाहिकेची तत्काळ दुरस्ती करण्यात यावी या प्रमुख मागणीला घेऊन येथील स्थानिक नागरिक समाजवादी पक्षाच्या नेत्वृत्वात नगर पालिकेला जमा झाले आणि आपल्या मागण्या निवेदनाद्वारे नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे देण्यात आले.
सदर निवेदन देतांना सीमा डोंगरे जिल्हा संघटक यांच्या नेतृत्वात सुलताना पठाण, शबाना पठाण, गोउसिया अंजुम, अमिरुन्निसा शेख, जिब्राइल शेख, मुन्ना शेख, शमीम शेख, इमराज पठाण, प्रमोद करंडे आणि बहुसंख्य समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

