आशीष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात दिनांक 11 फेब्रुवारी 2024 ला अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस गारपिटीचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांचे हाताशी आलेली पीक हिरावून नेले अशातच भारत राष्ट्र समिती पक्षाचे नेते डॉ. उमेश वावरे यांना माहिती मिळताच असंख्य कार्यकर्त्यांसह सातेफळ शिवारात पीक पाहणी केली.
यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा डॉ. उमेश वावरे यांच्यासमोर मांडली अजून पर्यंत शासनाचे कोणतेही कर्मचारी त्याच्या बांधावर आलेले नसून कोणीही पंचनामे केलेली नाही. त्यातच डॉ. उमेश वावरे यांनी शेतकऱ्यांना सांगितले की मी तुमच्यासोबत आहो घाबरण्याचा कोणतेही कारण नाही शासनाकडे या नुकसान भरपाईची मागणी करू असे आश्वासन यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.
डॉ. उमेश वावरे यांनी शासनाकडे एकच मागणी केली आहे की कोणतेही पंचनामे न करता तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत व शेतकर्यांना आत्महत्ये पासून वाचवायचे असेल तर सरसकट कर्ज माफी जाहीर करा अशी मागणी यावेळी डॉ. उमेश वावरे यांच्यातर्फे करण्यात आली.
शेतकऱ्यांचे हाताशी आलेले कापूस तूर, चना, गहू, ज्वारी अशा अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. तरी शासनाने त्वरित दखल घेऊन शेतकऱ्यांना संकटातून वाचवावे असे यावेळी उमेश वावरे यांनी सांगितले यावेळी उपस्थित. मनीष कांबळे, प्रदीप माणिकपुरे, चारुदत्त आटे, साहेबराव धोटे, हरी विजय घवघवे, राजू तिजारे, संदीप मुजबैले, शंकर धोटे, सुधाकर बोरकर, ज्ञानेश्वर वाघमारे, विठ्ठल मासुरकर, अरुण मासुरकर, माणिक धोटे, बालू तपासे, तुषार लंगगे, विनोद जवादे, गजानन मुळे, तुळशीराम तडस, अक्षय धोटे, यावेळी उपस्थित होते.