उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन छत्रपती संभाजी नगर:- सुभेदारी विश्रामगृह येथे मेहकर तालुक्यामधील तथागत बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने तथागत ग्रुप संपुर्ण राज्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून गोरगरिबांना मदत करणारी संघटना समोर येत असल्याने महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी तथागत ग्रुपच्या नावाचे जाळे पसरत असल्याने छत्रपती संभाजीनगर येथे ११ फेब्रुवारी रोजी विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे महाराज व संत सेवालाल महाराज यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनाच्या वतीने दिनांक 11 फेब्रुवारी रविवारला विधीतज्ञ, सामाजिक, उद्योजक, पत्रकारिता, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, कला, साहित्य अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांची कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्याला संदिप गवई बळ देण्याच काम संघटनेच्या माध्यमातून करतात असे प्रतिपादन पत्रकार श्रीकृष्ण काकडे यांनी येथे केले ते तथागत ग्रूपच्या वतीने आयोजीत केलेल्या भव्य राज्यस्तरीय पूरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.
याप्रसंगी या कार्यक्रमाचे उद्घाटक छत्रपती संभाजी नगरचे उद्योजक प्रभाकर जगताप (आबा) व युवा नेते दिनकर खरात तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तथागत ग्रुपच्या महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश महासचिव ललीता मगरे तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मेहकर विधानसभा मतदार संघाचे तसेच तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई या सर्व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून महापुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या पूरस्कार वितरण सोहळ्याला प्रामूख्याने उपस्थित मान्यवर म्हणून ॲड.देवकांत मेश्राम, अरूण जगताप, सुनिल वनारे, नागेश कांबळे, कांता राठोड, राजु गवई, राहुल ढेकळे, सचिन लोखंडे, श्रीरंग सनुंगले, रविंद्र असवणी, सुनिल इंगळे, प्रदिप सांंगडे, श्रीकांत सोले, राहुल वोजवळ, दुर्गादास अंभोरे, महादेव मोरे, श्रीकृष्ण शेटाने, राधेशाम खरात, सचिन गवई, संदिप राऊत, संतोष खरात, अंकुश हिवाळे, गौतम पैठणे, महिला आघाडी निशा सोनावणे, निता पैठणे, आशा कस्तुरे, लक्ष्मी कस्तुरे, राधा यंगड आदि मान्यवर प्रामुख्याने ऊपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रात ऊल्लेखनिय कार्य करणा-या गजानन सरकटे, श्रीकृष्ण काकडे, अशोक शेजुळ, रविंद्र वाघ, शितल कांबळे, वैभव काळे, तुषार बोरूडे, रोशन साबळे, अनिल खराटे, रोहीत गांधी, मनिषा बोरूडे, श्रृती बोज्जा, मिराताई कांबळे, संघमित्रा एँटम, ॲड.संघमित्रा दामोधरे, सिमा शिंदे, ॲड.सुनिता गायकवाड, डॉ.आरती कुलकर्णी, मीरा बेरड, प्रणिता कांबळे, डाॅ.ऐश्वर्या देवी या सर्व मान्यवरांना राज्यस्तरीय पूरस्कार देवून मान्यवरांचे हस्ते सन्मानीत करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवर प्रामूख्याने हजर होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गौतम नरवाडे यांनी केले तर प्रस्ताविक तथागत ग्रुपचे प्रदेश अध्यक्ष अविनाश कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटक कुणाल माने यांनी मानले. सर्व पुरस्कार प्राप्त झालेल्या विशेष मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. राज्यभरात कला, साहित्य, समाजसेवा, पत्रकारिता, शिक्षण, आरोग्य,राजकिय या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व सेवाव्रत्तींचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व विशेष दुपट्टा देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी समस्त तथागत ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.