मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- जल जीवन मिशन अभियान अंतर्गत जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा मध्ये हिंगणघाट येथील 6 विद्यार्थ्यांनी प्रावीण्य संपादन केले. त्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.
या जिल्हा स्तरीय स्पर्धेमध्ये प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचां सिंधुताई सपकाळ सभागृह जिल्हा परिषद वर्धा येथे सुनील मेसरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, विश्वास सिद प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, दीपक वाघ कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा यांच्या हस्ते प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार शाल, श्रीफळ, मोमेंटो व रोख रक्कम बँक अकाउंट वर वर्गीकृत करून करण्यात आला.
या स्पर्धेत निबध लेखन प्राथमिक गटामध्ये इंदिरा गांधी विद्यालय अलीपुर येथील कू. तनया कलोडे हिने प्रथम क्रमांक व माध्यमिक गटामध्ये भारत विद्यालय हिंगणघाट येथील प्रतीक्षा संजय तेलहांडे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. चित्रकला स्पर्धेच्या प्राथमिक गटामध्ये डॉ बी आर आंबेडकर विद्यालय येथील क. श्रुती फुलझेले हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच वक्तृत्व स्पर्धेत नी. मु. घटवाई विद्यालय वडनेर येथील कु. भागेश्री आंबटकर व डॉ. बी आर आंबेडकर विद्यालय हिंगणघाट येथील कु. राखी राठोड या दोघींना द्वितीय पारितोषिक विभागून देण्यात आले तर भारत विद्यालय हिंगणघाट येथील कु. श्रावणी सावंत हिला तृतीय बक्षिस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कु.संगीता पेठे, विषय साधन व्यक्ती यांनी कार्यक्रमांमध्ये पूर्णवेळ उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे संचालन संपदा बोधनकर, क्षमता विकास बांधणी तज्ञ व कार्यक्रमाचे आयोजनाचं नियोजन कैलास बाळबुधे I E C तज्ञ यांनी केले. यावेळी सर्व प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक श्री. अंजने गटविकास अधिकारी पंचायत समिती हिंगणघाट, तसेच अलका सोनवाने गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती हिंगणघाट तसेच शिक्षण विभाग हिंगणघाट येथील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी केले.