प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील पुलगाव शहरात मोठ्या प्रमाणात नशाखोरी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यात मोठ्या प्रमाणात शाळकरी मुले आणि जवान मुले पण या नशाखोरीत आघाडीवर असल्याने शहराचे वातावरण गढूळ झाले आहे. त्यामुळे कुटुंबात आपल्या मुलाबदल चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे भीम आर्मीचे वतीने पुलगावला नशा मुक्त करावे यासाठी पोलिस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
भीम आर्मी सदर मागणी नशेमध्ये धुंद असलेल्या गांजा व एमडी खाणाऱ्या पिणाऱ्या व्यक्तीवर भांडण सह गांजा व एमडी ची ही सुद्धा कलम लावून विविध कलम अंतर्गत कारवाई करण्यात यावी . यासाठी पुलगाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांना निवेदन दिले. भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांच्या नेतृत्वात भीम आर्मी महिला अध्यक्ष ज्योतीताई नगराडे यांच्यासह प्रणिता इंगळे, माला फुलझाले, द्वारका बोदिले, उमा बनसोड, ललिता रामटेके, सुचिता भगत, वर्षा जांभुळकर, सोनल इंगळे, शीला दवे, विमा गरडे, कांत उंबरे अनेक महिला पदाधिकारी गण उपस्थित होते.
आम्लीपदार्थचा नशा करणे गांजा व एमडी सारख्या पदार्थांच्या सेवन करिता विविध प्रकार घडत आहे गाडी चोरी बंद घर फोडणे नशे मध्ये मारहाण भांडण भाईगिरी मोटर सायकलचे स्टंट व त्याद्वारा केल्या गेलेल्या कर्कश आवाज मोटर सायकलचे विविध रूपातले सायलेन्सर हे देखील काढण्यात यावे इत्यादी वाईट प्रवृत्तीची लागली त्यांना सवय गांजा पिणाऱ्या वर एमडी खाणाऱ्या वर पोलिसांनी सक्तीची कारवाई करून गावातील नागरिकांचा त्यांच्यापासून बचाव करावा.
गांजा पिणाऱ्या वर एमडी खाणाऱ्या वर विकणाऱ्यावर पोलिसांनी सक्तीची कारवाई करून पुलगावला नशे मुक्त करावे भीम आर्मीची मागणी मागील काही दिवसापासून एमडी व गांजा याचे प्रमाण खूप वाढलेले आहे जागोजागी गांजाचा धुवा दिसू लागलेला आहे नशे मध्ये असणारे व्यक्ती गावातील कोणत्या नागरिकाला हानी पोहोचणार हे सांगता येत नाही तसेच यामुळे कित्येक तरुणांचे जीवन सुद्धा बरबाद झाले आहे याकरिता सार्वजनिक ठिकाणी वाद विवाद प्रमाण वाढले आहे. याला आळा घालण्याकरिता युवा पिढींना बरबादी पासून रोखण्यात यावे गावातील नागरिकांना या गोष्टीपासून बचाव व्हावा याकरिता प्रशासनाने अहम भूमिका घेऊन गांजा पिणाऱ्या व्यक्तीवर सक्तीची कारवाई करावी पिणाऱ्यापासून विकणाऱ्या सुद्धा शोध लागणार बस स्टॉप ते हायवेची चौफुली या दिशेने गांजाचे धूर अधिक प्रमाणात दिसून येतात रात्रीच्या सुमारास सात वाजता पासून रात्री एक दोन वाजेपर्यंत सेवन करणारे या परिसरात ठिकठिकाणी आढळून येतात यामुळे स्थानीय नागरिकांमध्ये महिलांमध्ये ट्युशनला जाणाऱ्या मुली हात मजुरी करणाऱ्या महिला आणि बहार घुमणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे नशेमधील व्यक्ती द्वारा विनाकारण गावातील नागरिकांना हानी पोचवल्यास अद्यापी असे झाल्यास पोलीस प्रशासनाने सर्वश्री जबाबदार राहणार याची दक्षता घेऊन त्वरित दखल घेऊन यांचा बंदोबस्त करावा ही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी शहरात दहशितीचे वातावरण निर्माण करून धमकी देणारे विनाकारण वाद विवाद करणाऱ्या संशय असलेल्या व्यक्तीचे नाव पोलीस आयुक्त व भीम आर्मी कार्यालयात गोपनीय द्वारा देण्यात आले आहे.