श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या आरोपी मागील 18 वर्षा पासून न्यायालय हजर न होता आपला पत्ता बदलून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती समोर आली आहे.
दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 11 आरोपींनी मिळून सशस्त्र दरोडा घातला होता. या सर्व आरोपी विरुद्ध दिंद्रुड पोलीस स्टेशन येथे गुरनं.14/2006 कलम-395 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले व तपास करून दोषारोप न्यायालयात सादर केले. त्यानंतर 18 वर्ष लोटूनही त्यामधील 11 आरोपी हे कोर्टात हजर होत नसल्याने न्यायालयाने या सर्व आरोपी विरुद्ध न्यायलयाने पकडवारंट काढला होता. या आरोपींना पकडण्यासाठी एलसीबी ला कामगीरी सोपवली होती.
एलसीबी ने कारवाईत करत दि.14 फेब्रुवारी रोजी आरोपी नामे सतुश ऊर्फ रमेश घनशा भोसले रा. सावरगांव ता.माजलगांव जिल्हा बीड हा सारखा पत्ता बदलत एमआयडीसी सावरगाव तालुका माजलगाव येथे असल्याची माहिती गुप्त बातमी दारा मार्फत पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाणे दिंद्रुड यांचे ग्रामपंचायत ताब्यात देण्यात आले असून आरोपीस उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
सदरची कामगिरी संतोष साबळे पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा बीड यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय राडकर, एएसआय तुळशीराम जगताप, पोलीस हवालदार पी.टी.चव्हाण, राहुल शिंदे ,चालक पोकाँ.सुनील राठोड यांनी केली आहे. सदर कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.