मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- येथील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव विजय नल्लावार यांच्या घरी तेलंगाना येथिल प्रसिद्ध समक्का सारक्का जत्रा भरते त्याचं धरती वर एटापल्ली येथिल नल्लावार परिवारातील विजय नल्लावार यांच्याही घरी दर दोन वर्षांनी समक्का सारक्का देवीच्या नावावर मोठीं पूजा केली जाते व नंतर प्रसाद वितरण केला जातो.
या वर्षी पण समक्का सारक्का यांची विधिवत पूजा अर्चना करण्यात आली होती. या कार्यक्रमाला आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप कोरेत यांनी उपस्थित राहून पूजन केले. यावेळी सर्व नागरिकांना सुख, समृद्धी आणि चांगले आरोग्य लाभो अशी प्रार्थना केली. यावेळी अमीत बेझलवार, सचिन येरोजवार, राजूभाऊ तीर्थगिरीवार, गणेश खेडेकर, विजय नल्लावार सह परिवारातील सदस्य उपस्थित होते.

