पुणे शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ऑनलाईन पुणे:- शहरातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यात ही अल्पवयीन पीडित मुलगी गर्भवती झाल्याने ही खळबळ उडवून देणारी घटना उघडकीस आली आहे.
6 महिन्या अगोदर वानवडी येथील लुल्लानगर येथील ग्राऊंडच्या कडेला असलेल्या झाडी झुडपात या पिढीत मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एकावर पोक्सो कायद्यांतर्गत पॉक्सो ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत वानवडी लुल्लानगर येथे राहणाऱ्या 18 वर्षीय मुलीने वानवडी पोलीस येते गुरुवारी आरोपी विरुद्ध फिर्याद दिली आहे. यावरून मुकेश कुमार मुखिया रा. डिफेन्स कॉलनी, लुल्लानगर, वानवडी याच्यावर आयपीसी 376, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी मुलगी आणि आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. 6 महिन्यांपूर्वी पीडित मुलगी तिच्या घराजवळ असलेल्या मैदानावर मित्रांसोबत फुटबॉल खेळत होती. फुटबॉल खेळत असताना बॉल ग्राऊंडच्या कडेला असलेल्या झाडी झुडपात गेला. पीडित मुलगी ही बॉल आणण्या साठी तिथे गेली असता आरोपीने तिला जबरदस्तीने झुडपात ओढून नेत तिच्या सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.