देवेंद्र सिरसाट, हिंगणा नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणा:- दिनांक १४ फेब्रुवारीला बापू शिक्षण संस्था संचालित श्रीकृष्ण हायस्कूल, कान्होलीबारा येथे विद्यार्थ्यांवर मुल्य संस्कार रुजविण्यासाठी मातृ पितृ पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम संस्था अध्यक्ष ॲड. विनय धाबे व सचिव ॲड. वंदन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्याध्यापिका अरुणा कुकडे यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या कार्यक्रमात माजी प्राचार्य रा क. वास्कर, अशोकराव कुकडकर, सरपंच पल्लवी कुकडकर , उपसरपंच निशांत बोटरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचे पाय धुऊन, अक्षता लावुन त्यांचे औक्षण केले. त्यांच्यावर फुले वाहून नमस्कार केला. सदर कार्यक्रमास ७५ विद्यार्थ्यांचे आई वडील सहभागी झाले होते. याकार्यक्रमाचे संचालन माया लोखंडे , प्रास्ताविक प्रशांत कुनघाटकर व नियोजन पर्यवेक्षक सुनिल बुंडे व बाळकृष्ण श्रीरामे यांनी केले होते.
या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले. संस्थेच्या आमगाव देवळी , सावंगी आसोला येथील श्रीकृष्ण हायस्कूल मध्येही मातृ पितृ पूजनाचे आयोजन करण्यात आले होते.