प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विद्यार्थ्यानी मोठे स्वप्न व मोठे ध्येय समोर ठेवावे आणि ते पुर्ण करण्यासाठी तुम्हाला जेवढे परिश्रम करता येईल तेवढे करा मग तुम्हाला आकाश सुध्दा लाबं वाटणार नाही. तुम्ही जे स्वप्न बघाल ते पुर्ण करताना तुमची झोप उडाली पाहीजे किवा ती पुर्ण केल्या शिवाय तुम्ही शांतपणे झोपु शकणार नाही. तुम्हाला यशश्वी बनायेच असल्यास तुमची स्वाक्षरी ही अन्य साठी ऑटोग्राफ झाली पाहीजे असे मोलाचे विचार हिंगणघाट येथिल उपविभागीय अधिकारी शिल्पाताई सोनाले यानी व्यक्त केले त्या भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रथ सप्तमी निमित्य आयोजित सामुहिक सुर्यनमस्कार व बालसंगम या कार्यक्रमात बोलत होत्या.
यावेळी मंचावर प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते तथा श्वास संघटनेचे अध्यक्ष विठठल गुळघाणे, प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन सोसायटीचे कार्यकारणी सदस्य तथा माजी मुख्याध्यापक बळीराम चव्हाण, मुख्याध्यापक राजु कारवटकर, उपमुख्याध्यापक हरीश भट्टड, पर्यवेक्षिका बुरिले आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले म्हणाल्या की, भारत विद्यालय हे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठीच नव्हे तर सांस्कृतीक, आध्यामिक तसेच मानसिक प्रगती कडे लक्ष देते ही गौरवाची बाब आहे. याप्रसंगी विठठल गुळघाणे विद्यार्थ्यानी नेहमी गुरूचा आदर करावा. विद्यार्थ्यानी अभ्यासा करिता जेवढे कष्ठ करावे लागेल तेवढे करावे. आपले उदिष्ठ गाठलेच पाहिजे. यावेळी कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष बळीराम चव्हाण म्हणाले की यानी आमचे विद्यालयात विद्याभारती अंतर्गत चालण्या-या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी हा संस्कारमय व्हावा त्याचा शारिरीक, बौध्दिक मानसिक विकास करण्याचा प्रयत्न असतो.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविकातुन मुख्याध्यापक राजुजी कारवटकर म्हणाले देशभरातील विद्याभारतीशी संलग्नित शाळेत आज जगभरात आज सामुहिेक सुर्यनमस्कार घेतल्या जात आहे. सुर्यनमस्कार हा आदर्श उपयुक्त अभ्यास आहे. याचा सर्वानी विचार करावा. प्राण शक्ती निर्माण करण्याचे काम सुर्यनमस्कार काम करते. योग साधनेचे सर्वांत सोपे आणि परिणामकारक अंग म्हणजे सूर्यनमस्कार होय.. सूर्यनमस्कार घातले तर सर्व आसने करण्यास लवचिकता येते. रथसप्तमी निमित्य क्रिडा शिक्षिक, विनोद कोसुरकर, चांभारे. संजना चौधरी यांच्या मार्गदर्शनात सुर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, कोकीळासन, गोमुखासन, पदमासन, पर्वतासन इत्यादी व्यायाम योग व योगासनाची प्रात्यक्षिक विद्यार्थ्यानी केली. यावेळी विद्यालयातील उपस्थित 2000 विद्यार्थ्यानी सामुहिेक सुर्यनमस्कार घातले तसेच आस्टेडु आखाडाचे प्रात्यक्षिक दाखविले.
याप्रसंगी सामुहिक एकातमता स्त्रोत्र ,सांघिक गीत घेण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. मनिषा कोंडावर यानी केले तसेच कार्यक्रमाचे या आभार प्रर्दशन उपमुख्याध्यापक हरीश भट्टड यानी केले. वंदेमातरम नी या कार्यक्रमाची सांगता झाली.

