इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज सारखा दुसरा राजा नाही : मुख्याध्यापक राजूजी कारवटकर
अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- छत्रपती शिवाजी महाराजांचा यांचा प्रत्येक मावळा हा दहा हत्तीच्या बळा एवढा ताकदवान योद्धा होता. शिवाजी महाराज एक धाडसी, शूर आणि तेजस्वी मराठा सम्राट होते. ते धर्मनिष्ठ होते. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर यांसारखे कितीतरी जिवास जीव देणारे मावळे शिवरायांना मिळाले. त्यांचा आपल्या मावळ्यांवर पूर्ण विश्वास होता. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर व रयतेवर जीवापाड प्रेम केले. शिवाजी महाराज जर दहा वर्ष अधिक जगले असते तर इंग्रजांना हा हिंदुस्थान पूर्णपणे पाहताही आला नसता. औरंगजेब 84 वर्षे जगला तर छत्रपती शिवाजी महाराज फक्त 48 वर्षे जगले. जर ही आकडेवारी उलट झाली असती तर हिंदुस्थानचा चेहरा वेगळा असता. छत्रपती शिवाजी महाराज औलकिक कर्तुत्वान होते. व्यवहारीक कला गुणांनी संपन्न असा हा राजा इतिहासात सापडणे दुर्मिळ आहे. जगाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज सारखा दुसरा राजा सापडणे अशक्य आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले, व्हियेतनाम, अमेरिका, पाकिस्तान यासारख्या देशात शिवाजी महाराजांचा इतिहास हा पाठ्य क्रमात शिकवला जातो. पण भारतात मात्र हे दुर्दैव आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे बुद्धीचातुर्य, कर्तृत्व, युद्धकला यात मातब्बर होते, अफाट होते. स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे अल्प आयुष्य जगले पण अजरामर झाले. महाराजांनी स्वराज्याची स्थापना शासन करण्यासाठी नव्हे तर त्याच्या रक्षणासाठी केली होती. जर शिवाजी महाराज नसते तर आपली भारतीय संस्कृती नष्ट झाली असती. विद्यार्थ्यानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील पुस्तकाचे वाचन करावे, असे विचार मुख्याध्यापक राजूजी कारवटकर यानी व्यक्त केले. ते भारत विद्यालय हिंगणघाट येथे आयोजित हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती निमित्य आयोजित कार्यक्रमा मध्ये बोलत होते.
यावेळी मंचावर पर्यवेक्षिका बुरिले, पर्यवेक्षक नांदुरकर, दिवाकर निखारे आदी उपस्थित होते. याप्रसंगी दिवाकर निखारे यांच्या सह अनेक विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी वर्ग 5 वी ची अनुष्का बोभाटे, श्रृतिका मुजबैले, संकिता गौळकर, संर्घष येळणे या विद्यार्थ्यानी आपल्या भाषनानी सर्वाचे मन जिंकले.