आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष तथा गाव चलो अभियान अहेरी विधानसभा संयोजक संदीप कोरेत यांच्या नेतृत्वाखाली अतिदुर्गम भागातील येचली गावात गाव चलो अभियान.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली तर्फे गाव चलो अभियान कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या मार्गदर्शना खाली राबविण्यात येत आहे. हेच औचित्य साधून आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा गाव चलो अभियान अहेरी विधानसभा संयोजक संदीप कोरेत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी तालुका भामरागड तर्फे तालुक्यांतील 194 येचली बुथावर जाऊन गाव चलो कार्यक्रम घेण्यात आला.
तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेले येचली 194 या बुथावर जाऊन केन्द्र सरकार/राज्य सरकारच्या योजना समजवण्यात आल्या तसेच बुथप्रमुख, वारीयर्स यांना गाव चलो अभियानाचे पत्रिका देऊन बुथसमीती, पन्नाप्रमुख, पुर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.
यावेळी भामरागड भाजप तालुकाध्यक्ष अर्जुन बापु आलाम, रमेश तलांडे बुथप्रमुख, भिमराव वनकर प्रवासी कार्यकर्ते, काशिनाथ सरामपल्लीवार, आशन्ना राजपल्लीवार, महेश तलांडी, तुळशीराम धरमशाते, रमेश नागपुरवार, दशरथ दुर्गे, बिचंगा गूंडावार, गावातील नागरिक बुथप्रमुख वारीयर्स तथा बहुसंख्येने भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.