हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपुर दि.22:- शहरातील विविध प्रभागातील रस्ते, नाली यासारख्या पायाभूत सुविधांच्या संदर्भात खालील समस्यांकडे प्रशासनाने लक्ष घालून ते सोडविण्यास प्राधान्य द्यावे. शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलावर यांच्या नेतृत्वाखाली बल्लारपूर नगरपरिषदचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांना निवेदन देण्यात आले.
१) शहरातील बालाजी वार्डात स्थित असलेल्या मानसी अपार्टमेंट परीसरात नगरपरिषदे कडून अजूनपर्यंत पक्का रस्ता व नालीची सोय करण्यात आलेले नाही. आपत्कालीन परिस्थितीत कोणती ही सुविधा भेटू शकत नाही. या अपार्टमेंट च्या बांधकामास NOC दिली व वार्षिक मालमत्ता कर वसूल केले जात आहे तर नागरिकांकरीता रस्ते व नालीची सोय करण्याची जबाबदारी सुद्धा नगर परिषदेने घ्यावे. २) विद्यानगर वार्डातील रवि पुप्पलवार यांच्या घरापासून तुकाराम देठे यांच्या घरामागील जवळपास 200 मीटर लांबीची नाली व बंडू चंदावार ते बंडू काकडे यांच्या घरामागील व केवल किराणा ते आदर्श चौक पर्यंत नाली जीर्ण अवस्थेत आहे. या नाल्यांचे अंडरग्राऊड बांधकाम लवकरात लवकर करावे. ३) विद्यानगर वॉर्डांत आदर्श चौक ते रसूल ठेकेदार यांच्या घरा पर्यंत रस्त्याची अवस्था खराब आहे, अनेक वर्षांपासून हा रस्ता दुर्लक्षित आहे. या रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर करावे. ४) डाॅ. राजेंद्रप्रसाद वॉर्डातील आझाद चौक ते के.जी.एन शाळेपर्यंत चा रस्ता तसेच प्रज्ञा चौक ते अमन चौक पर्यंत चा रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. या रस्त्याचे देखील नूतनीकरण करावे. ५) राजेंद्र प्रसाद वार्डातील विदर्भ चौक परिसरातील हनमलवार व सुजीत सोनारकर यांच्या घरासमोर मोठे खुल्या नाल्या आहेत. त्यांचा नागरिकांना होणारा त्रास दुर करण्यासाठी नालींवर लवकर पुलिया चे बांधकाम करण्यात यावे. ६) शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेले सुभाष टाॅकिज पासून बालाजी वार्डातील टिचर काॅलनी कडून जाणारा मार्ग देखील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. त्याचे लवकरात लवकर नूतनीकरण करावे. ७) त्रिशरण बुद्ध विहार मागील रोडची लवकर दुरुस्ती करण्यात यावे.
या गंभीर समस्यांची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करून या सर्व समस्यांचे निराकरण होण्यास किती दिवस लागतील याची लेखी माहिती मागण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार, सचिव ज्योतीताई बाबरे, प्रवक्ता आसिफ शेख, किरण खन्ना, सलमा सिद्दिकी, स्मिता लोहकरे, अजयपाल सुर्यवंशी, विवेक पिंपळे, ओमप्रकाश चौबे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.