निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विदर्भ पटवारी संघ, नागपूर, उप-विभाग शाखा राजूरा ची वार्षिक आमसभा नुकतीच पटवारी भवन, राजूरा येथे किशोर कुलकर, अध्यक्ष, राजूरा यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश सुर्वे, अध्यक्ष वि. प. संघ, जिल्हा शाखा, चंद्रपूर, धनराज पारसे, उपाध्यक्ष, सुनील चौधरी, धनराज बुराडे, दिगांबर गेडाम, किशोर उईके, मंडळ अधिकारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी राजूरा उप- विभाग नवनियुक्त कार्यकारणीची निवड करण्यात आली.
अध्यक्ष पदी किशोर एस. कुलकर याची तर उपाध्यक्षपदी सुनिल रामटेके व सचिवपदी लक्ष्मीकांत मासीरकर यांची निवड झाली. यात सहसचिव पदी परवेझ शेख, कोषाध्यक्ष दामोधर शेंडे, सदस्य किशोर उईके, प्रकाश कमलवार, सागर कोडापे, प्रविण गंधमवार, विलास चिने, दिगांबर वडस्कर यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाचे संचालन, सागर कोडापे यानी तर आभार प्रदर्शन किशोर उईके यांनी केले. राजुरा उपविभागातील सर्व पटवारी गण उपस्थित होते.

