रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मंठा:- मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने सरकारने आश्वासित केल्याप्रमाणे सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मराठा समाजाचे राज्यभर आदर्श रास्तारोको आंदोलन होणार आहे.
त्याच पार्श्वभूमीवर मंठा तालुक्यातील केंधळी गावात जालना नांदेड हायवे वर सकल मराठा समाज बांधवांनी सकाळी १०:३० ते १:०० आणि दुपारी ४:०० ते ७:०० या वेळेमध्ये गावातील सकल मराठा समाज आदर्श रास्तारोको आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या केंधळी येथील सकल मराठा समाज बांधवांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
यावेळी पोलिस उपअधीक्षक सुरेश बुधवंत, नायब तहसीलदार शिंदे, मंठा पोलिस निरीक्षक रवींद्र निकाळजे, उप निरीक्षक कैलास भारती, सतिश आमटे, आनंद ढवळे, सविता फुलमाळी, रिना हिवाळे, विकास पवार, मिलिंद लहाने, संदिप राठोड, गोपाल राठोड व केंधळी गावातील सकल मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.