अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानिक डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्वच्छते चे पुजारी संत गाडगे महाराज म्हणून ओळखले जाणारे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था सचिव अनिल जवादे, प्रमुख उपस्थिती म्हणून दत्ताजी राऊत (ग्रामगीता प्रचारक) प्राचार्य एच.पी गुडदे, उपप्राचार्य विजय नानोटकर, उपमुख्याध्यापक डॉ. चंद्रकांत नगराळे, पर्यवेक्षक दिनेश वाघ, रवींद्र शिरपूरकर, सुनिता खैरकार, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप देवतळे, प्रा पंकज ठाकरे, विशाल वरघणे, सचिन थुल, आशिष रेंडे, दिलीप भेंडे, किरण रोहनकर आदी मान्यवर च्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला दिपप्रज्वलन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रथम संस्था सचिव अनिल भाऊ जवादे यांनी संत गाडगे महाराज यांच्या जीवन कार्याची गाथा विषद केली, प्राचार्य एच.पी. गुडदे यांनी संत गाडगे महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. संचालन आरती सुरकार तर आभारप्रदर्शन गौरी हिवरकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रा. डी. एम पाटील, प्रशांत भटकर यांनी सहकार्य केले कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.