Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल वरघंटे यांच्या अकाली निधनाने हळहळ, अंत्यसंस्काराला हजारोंची उपस्थिती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 24, 2024
in Uncategorized, गडचिरोली, विदर्भ
0 0
0
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल वरघंटे यांच्या अकाली निधनाने हळहळ, अंत्यसंस्काराला हजारोंची उपस्थिती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

एकनिष्ठ, अजातशत्रू कार्यकर्ता गमावला- खासदार अशोक नेते

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि सुरूवातीपासून भाजपशी जुळून असलेले युवा कार्यकर्ते स्वप्निल वरघंटे ४१ वर्ष यांचा शुक्रवारच्या पहाटे अचानक प्रकृती बिघडून हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. आज शनिवारी सकाळी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खासदार अशोक नेते यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि चामोर्शी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी स्वप्निल वरघंटे यांची फुलांनी सजवलेल्या वाहनावरून चामोर्शी शहरातून अंत्ययात्रा काढून मार्कंडेश्वर मंदिराजवळील वैनगंगेच्या घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यान ‘स्वप्निल वरघंटे अमर रहे…’ असे नारे नागरिकांकडून दिले जात होते.

यावेळी झालेल्या शोकसभेत बोलताना खा. अशोक नेते म्हणाले, एक अजातशत्रू, निष्ठावंत आणि सतत धडपड करणारा कार्यकर्ता मी गमावला आहे. त्याच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळलेल्या विद्यमान आमदार डॅा.देवराव होळी यांना भाजपमध्ये आणून त्यांना तिकीट मिळवून देण्यातही स्वप्निल वरघंटे यांचा महत्वाचा वाटा होता. वयाच्या अकरा बारा वर्षात अल्पवयात राजकीय जीवनाला सुरूवात करून तत्कालीन चामोर्शी ग्रामपंचायतमध्ये पक्षाची सत्ता बसवण्या पासून तर दिग्गज उमेदवाराला हारवून जिल्हा परिषदवर निवडून जाईपर्यंत त्यांनी लोकसंग्रह जमविला होता. चामोर्शी जनतेच्या मनातला हिरा आज गमावला अंत्ययात्रेला जमलेली मोठी गर्दी हे त्याचेच प्रतिक असल्याचे खा. अशोक नेते म्हणाले.

या शोकसभेत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, डॅा.मिलिंद नरोटे, धोबी समाज संघटनेचे भैयाजी रोहणकर, नगरसेवक सुनील तुरे, महेश अल्लावार, डॅा. दुधबळे, चांदेकरजी, गजानन बारसागडे अशा अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी अंत्यविधीला कि.आ. प्रदेश सचिव रमेश भूरसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, भारत खटी, माजी सभापती संतोष तंगडपल्लीवार, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, ओबिसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, कि.आ. जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, शहराध्यक्ष सोपान नैताम, गोवर्धन चव्हाण, सोमय्या पसूला, सुधाकर पेटकर, माणिक कोहळे, सोपान नैताम, आशिष पिपरे, सुरेश शहा, दिलिप चलाख, चेतन गोरे, रमेश अधिकारी, विनोद गौरकर, नरेश अल्लसावार, भाष्कर बुरे, निखील धोडरे, रेवनाथ कुसराम तसेच बहुसंख्येनी नागरिक उपस्थित होते.

जीव वाचविण्यासाठी सर्वांची धडपड

गुरूवारच्या मध्यरात्री दिड वाजताच्या सुमारास स्वप्निल यांना हार्टअटॅक आला. चामोर्शीत प्राथमिक उपचार करून लगेच गडचिरोलीत हलविले जात असताना वाटेत त्यांना पुन्हा हृदयविकाराचा दुसरा अटॅक आला. गडचिरोलीत जिल्हा सामान्य रुग्णालयात व्हेंटिलेटर लावून सर्व प्रकारचे उपचार करण्यात आले. त्याचदरम्यान गोंदिया जिल्ह्यातील कचारगड, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील घोडायात्रा येथील कार्यक्रम आटोपून खा.अशोक नेते पहाटे ४ च्या सुमारास गडचिरोलीच्या वाटेवर असताना त्यांना याबद्दल कळले. त्यांनी लगेच जिल्हा शल्य चिकित्सकांना योग्य उपचाराबाबत सूचना करून पहाटे ५ च्या सुमारास थेट जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. पण नियतीच्या ईच्छेपुढे कोणाचे काही चालले नाही. उपचार सुरू असतानाच ५.३५ वाजता स्वप्निल यांनी अखेरचा श्वास घेतला. एक सच्चा सहकारी गमावल्याचे दु:ख पचवून खा.नेते यांनी संध्याकाळी चामोर्शी गाठून वरघंटे कुटुंबियांचे सांत्वन करत दुःखात सामील होऊन त्यांना धीर दिला.

Tags: खासदार अशोक नेतेगडचिरोली जिल्हाभाजपास्वप्निल वरघंटे यांच्या अकाली निधन
Previous Post

डॉ. बी.आर आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट येथे संत गाडगे महाराज जयंती साजरी.

Next Post

सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी दिला माणुकिचा परिचय, रुग्णांने मानले पाणावल्या डोळ्याने उमेश इंगळे यांचे आभार

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी दिला माणुकिचा परिचय, रुग्णांने मानले पाणावल्या डोळ्याने उमेश इंगळे यांचे आभार

सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी दिला माणुकिचा परिचय, रुग्णांने मानले पाणावल्या डोळ्याने उमेश इंगळे यांचे आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In