हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे पोक्सो कायदेविषयक मार्गदर्शन दि. 26 फेब्रुवारी रोजी पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी. बी. भगत (मुख्याध्यापक), प्रमुख मार्गदर्शक ऍड. आय. आर. सय्यद अध्यक्ष तालुका अधिवक्ता संघ बल्लारपूर, ऍड. राजेश लिंगे बल्लारपूर तर प्रमुख उपस्थिती सौ. सारिका शेंडे उपाध्यक्ष पालक शिक्षक संघ यांची होती.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला मार्ल्यापण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मंचावर उपस्थितांचे गुलाबकळीने स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविकात पोक्सो कायद्याबद्दल माहिती देताना शाळेचे शिक्षक आर. बी. अलाम यांनी ” बॅड टच आणि गुड टच ” याबाबत मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शक ऍड. राजेश लिंगे यांनी पोक्सो कायद्या. तील विविध कलमा, कन्सेट आदीबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी जागरूक राहिले पाहिजे असे सांगितले. तसेच ऍड. आय. आर. सय्यद अध्यक्ष तालुका अधिवक्ता संघ बल्लारपूर यांनी नॅशनल चिल्ड्रन प्रोटेक्शन पॉलिसी अनुसार पोक्सो कायद्याबद्दल माहिती दिली.
अध्यक्षीय भाषण करताना बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी सांगितले की, पोक्सो कायद्यात पीडीतेला न्याय कसा मिळेल याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाचे संचालन एस. एन. लोधे मॅडम व आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमात आर. के. वानखेडे, एम. डी. टोंगे, यु. के. रांगणकर आदी शिक्षक, वामनभाऊ बोबडे, गणेश चंदावार (बाबू), जगदीश कांबळे, इंद्रभान अडबाले आधी शिक्षकेतर कर्मचारी, रंजना शर्मा, वर्षा ठाकरे, पुरन सिंह, सुषमा दुर्गे, वर्षा मांदाळे, सुकेशनी निमकर, अमोल वेले, महेंद्र भडके, पौर्णिमा पाटील आदी पालक तसेच विद्यार्थी वृंद उपस्थित होते.