निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- अंबुजा सिमेंट फाउंडेशन दरवर्षी प्रमाणे यंदाही २२ फेब्रुवारी ते २२ मार्च यादरम्यान पाण्याविषयी जनजागृती करण्याचे कार्य करते. २२ मार्च हा जागतिक पाणी दिवस म्हणून साजरा केला जातो याची औचित्य साधून दरवर्षी अंबुजा सिमेंट फाउंडेशनच्या वतीने पूर्ण एक महिना पाणी व पाण्यावर आधारित विविध कार्यक्रमाचे आयोजन अंबुजा सिमेंट फाउंडेशन परिसरातील आजू बाजूला असणाऱ्या गावात अभियान स्वरूपात राबवितात. यामध्ये जलदिंडी, जल प्रशिक्षण, शाळेतील मुलांची रॅली, रांगोळी स्पर्धा, पोस्टर प्रदर्शन असे विविध कार्यक्रम घेऊन साजरा केला जातो. हे करण्यामागचा उद्देश म्हणजे परिसरातील लोकांना पाण्याचे महत्व कळावे आणि पाणी संवर्धनास मदत व्हावी. पावसाचे पाणी मुरवता यावे, जिरवीता यावे, साठवता यावे हा मुख्य उद्देश घेऊन इत्यादी कार्यक्रम राबविले जातात.
याच अनुषंगाने आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा थूट्रा येथे शाळेतील मुलांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले या पाणी अडवा पाणी वाचवा, जल ही जीवन है, पाण्याचे संवर्धन धरतीचे रक्षण, जल है तो कल है यासारख्या घोषणा देत गावभर प्रभात फेरी काढण्यात आली. ही रॅली श्रीकांत कुंभारे, (झोनल हेड) अंबुजा सिमेंट फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनात व चंद्रकांत धानोरकर (प्रोजेक्ट एक्झिक्यूटिव्ह) अंबुजा सिमेंट फाउंडेशन यांच्या नियोजनात पार पडली. या रॅलीसाठी प्रामुख्याने उपस्थिती शाळेचे मुख्याध्यापक सुरेश आत्राम, कोडमेलवार मॅडम, शिंदे मॅडम तसेच किशोर हजारे क्षेत्रीय समन्वयक अंबुजा सिमेंट फाउंडेशन पवन वडस्कर व चंदा पोटे प्रक्षेत्र अधिकारी हे होते.