अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेल्या वाकी येथील श्री. संत बाबा ताजुद्दीन यांच्या दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पाटणसावंगी येथून जवळच असलेल्या श्री. क्षेत्र वाकी दरबार येथे श्री. संत बाबा ताजुद्दीन यांच्या वार्षिक उर्सची सुरुवात रविवार दि.३ मार्च पासून होणार असून उर्सची संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आहे.
श्री. संत बाबा ताजुद्दीन यांच्या उर्स निमित्त विविध प्रकारची दुकाने, उपहारगृहे, मनोरंजनात्मक प्रतिष्ठाने, आकाश पाळणे, झुला, मौत का कुव्वा, पूजा साहित्य दुकाने आदींची सजावट होत आहे, तसेच उर्स निमित्याने संपूर्ण ताज दरबार व परिसराची विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली आहे. पोलीस चौकी, प्राथमिक आरोग्य केंद्र, अग्नीशामक, बस स्थानक, ऑटो रिक्षा, मोटर सायकल, जीप, कार, वाहन स्टॅन्डसाठी स्वतंत्र जागा देण्यात आली आहे. यावेळी भाविकांना ट्रस्ट तर्फे दररोज महाप्रसाद वितरित होणार आहे. उर्सची जय्यत तयारी व व्यवस्थापन प्रभाकर डाहाके (पाटील), ज्ञानेश्वर डाहाके (पाटील) सांभाळत आहे.
वाकी उर्स बाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी खलाटे सावनेर यांच्या उपस्थितित वाकी दरबार येथे ताजुद्दिन बाबा यांच्या सालाना उर्सच्या तयारी व देखरेखी बाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला सावनेरचे तहसीलदार, पोलीस अधिकारी सावनेर खापा, खंड विकास अधिकारी, महावितरण अधिकारी, राज्य परिवहन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र पाटणसावंगीचे अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, ग्रा.प.सरपंच व सदस्य, ट्रस्ट चे ट्रस्टी श्री. प्रभाकर डहाके (पाटील), श्री. ज्ञानेश्वर डहाके (पाटील), श्री.मधुकर टेकाडे व श्री.सचिन डांगोरे उपस्थित होते.
या बैठकीत सालाना उर्स शांततेत पार पडावा, ये – जा साठी मार्ग मोकळा द्यावा, महिला सुरक्षा व शौचालय, गर्दीचा बंदोबस्त, चोरापासून सावधगिरी, स्वछता, पाणी आदी विषयांवर चर्चा व त्यासाठीची तयारी करण्याबाबत विचार करण्यात आला. विविध क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांना आदेश देण्यात आल्याचे वाकी दरबार ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर डहाके (पाटील) यांनी सांगितले.

