सखाराम जाधव, घनसावंगी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन घनसावंगी:- दिनांक 2 मार्च रोजी अटल भूजल योजना अंतर्गत वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यलय भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा जालना माहिती, शिक्षण व संवाद महिला उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत रांजणी येथे महिलांची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. गावातील बचत गटातील महिलांनी उस्पूर्त असा सहभाग घेऊन त्यामध्ये पाणी बचतीवर आधारित सुंदर प्रकारे रांगोळ्या काढण्यात आल्या.
भूजलाच्या अनियंत्रीत उपशामुळे होत असलेली भूजल पातळीतील घसरण थांबविणेकरीता केंद्र शासन व जागतिक बँक यांचे संयुक्त विद्यमाने राज्यात केंद्र पुरस्कृत अटल भूजल योजना राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.
मागणी (पाणी बचतीच्या उपाययोजना) व पुरवठा (जलसंधारण व भूजल पुनर्भरण) व्यवस्थापनाच्या सुत्राचा अवलंब करुन भूजलाच्या साठ्यात शाश्वतता आणणे. या करीता सद्यस्थितीत कार्यान्वित असलेल्या केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजनाच्या जसे की, मनरेगा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन इत्यादी माध्यमातुन होत असलेल्या गुंतवणुकीमध्ये एककेंद्राभिमुखता साधणे. भूजलाच्या शाश्वत विकासाकारीता राज्य, जिल्हा व ग्राम पातळीवर सक्षम संस्थात्मक व्यवस्था निर्माण करणे. सदर प्रकल्पाची मुख्य उद्दीष्टे आहे. त्यामुळे याची जनजागृती करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेदरम्यान गावातील महिला, कुषी सखी, अंगणवाडी सेविका, DPMU माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ नागेश कंधारे सर व DIP चे भारत कोळे आणी गावातील नागरिक भारत जाधव, किरण देशमुख, अनिल लगामे, अरविंद जाधव, संजय चव्हाण, विलास जाधव, वशिम शेख, भगवान मोरे, अविनाश जाधव हे उपस्थित होते.