विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- गावातील मुख्य रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते आहे. पण नगर पंचायत प्रशासन मग्रुर बनून दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नगर पंचायत प्रशासना विरुद्ध नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
एटापल्लीतील मुख्य रस्त्यावरील वाईट परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी नगर पंचायत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून, मुख्य रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वाहनांच्या सतत ये-जाामुळे धुळ उडते आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या धुळीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
आरोग्य समस्या: धुळीमुळे श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ आणि त्वचेच्या समस्या वाढल्या आहेत. दुर्घटनांचा धोका: धुळीमुळे वाहनचालकांना दृश्यमानता कमी होते आणि अपघातांचा धोका वाढतो. अस्वच्छता: धुळीमुळे परिसर अस्वच्छ आणि घाणेरडा दिसतो.
या समस्येचे निराकरण करण्यासाठी, आम्ही खालील मागण्या करतो: मुख्य रस्त्यावर त्वरित पाणी टाकून धुळीचे प्रमाण कमी करा. रस्त्यावर डांबरीकरणाचे काम पूर्ण करा.नियमितपणे रस्त्यांची स्वच्छता करा. आम्ही आपणास विनंती करतो की या समस्येकडे त्वरित लक्ष द्या आणि नागरिकांना धुळीमुक्त वातावरणात राहण्याचा अधिकार द्या. असे निवेदन देण्यात आले.
यावेळी ऑल इंडिया युथ फेडरेशन एटापल्लीचे कॉ. विशाल पूजजलवार तालुका अध्यक्ष कॉ. सुकेश हिरा, कॉ.पंकज बाराई, कॉ सुमित नाडमवार सह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक यावेळी उपस्थित होते