अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- उत्तर प्रदेश मधील सिलाईबार गावात 17 वर्षाच्या बालकावर गोळीबार करणाऱ्या पोलिस प्रशासनावर कडक कारवाई करण्याबाबत, वर्धा जिल्हा कॉंग्रेस कमिटी अनुसूचित विभाग चे अध्यक्ष ज्वलंत मून यांच्या नेतृत्वाखाली हिंगणघाट तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
उत्तर प्रदेश रामपूर मधिल सिलाईबार गावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बोर्ड लावण्यात आला. त्याच वेळी 17 वर्षीय बालक सुमेश हा वर्ग १० वि ची परीक्षा देऊन परत येत असतांना त्याच्यावर पोलीस प्रशासना कडून गोळीबार करण्यात आला आणि त्यामध्ये त्या बालकाचा मृत्यू झाला. परंतु त्याची कोणत्याही प्रकारची चौकशी न करता त्याचा अंतिम संस्कार करण्यात आला. हे सर्व कृत्य अमानवीय आहे. या प्रकरणी सदर पोलिस प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी, आणि सुमेश या बालकाला तसेच त्यांचे कुटुंबीयांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी निवेदना द्वारे करण्यात आली.
या प्रसंगी डॉ.जयंत दुधे वर्धा जिल्हा सरचिटणीस, सुजाता जीवनकर जिल्हा सचिव, प्रविण पाटील शहराध्यक्ष हिंगणघाट, सचिन कुत्तरमारे तालुका अध्यक्ष हि, सुनील दिवे, सेवकदास वानखेडे, भाऊराव भगत, अनिल भगत, विनय शंभरकर, उज्वला भगत, पुष्पा पाटील, अमित सोगे, सुरेंद्र बोरकर, सिद्धार्थ मस्के शहर संघटक, सुधिर अलोने प्रामुख्याने उपस्थित होते.

