अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील वणी येथे स्थित असलेल्या संगुना फ्रुटस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनिचा सोयाबिन प्रकीया उद्योग अनेक वर्षा पासुन वसलेला आहे. कंपनीच्या वतीने या कारखान्या मध्ये सोयबीनवर प्रकीया करुन खाद्य तेल व अन्य उत्पादने घेतली जातात. पण खाद्य तेला बाबत जनते मध्ये मोठ्या प्रमाणात सम्रंभ निर्माण झाला आहे.
भारतीय अन्न सुरक्षा व मांनक प्राधीकरणाच्या मार्गदर्शक नियमानुसार खाद्य पदार्थ निर्मीती व विक्री करणार्या कोणत्याही कंपनिला त्याचे उत्पादन बाजारात विकताना ते शाहाकारी किंवा मांसाहारी असल्याची माहिती देणे आवश्यक आहे. या करीता मांसाहारी उत्पादनाच्या प्रत्येक पॅकिंगवर लाल बिंन्दूचा कोड अंकीत केल्या जातो. तर शाकाहारी श्रेणीतील उत्पादनावर हिंरबा बिंन्दू अंकीत केल्या जातो. संगुना फ्रुटस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मात्र आपल्या शाकाहारी असलेल्या सोयाबिन तेलाच्या उत्पादनावर हा लाल ठिंबक अंकीत केल्याने बाजारपेठेत ग्राहक व विक्रत्या मध्ये मोठा संमभ्रम निर्माण झाला आहे. कंपनिने मात्र हि नजर चूकिने घडल्याची माहिती देऊन हि मानवी चूक असल्याचे सांगीतले आहे.
संगुना फ्रुटस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मद्रर्स डि लाईट या खाद्य तेल स्थानिक बाजारपेठत मोठ्या प्रमानावर उपलब्ध आहे. संपुर्णताहा शाकाहारी असल्याचाही दावा कंपनीने केला आहे. आमच्या प्रतिधीनी ने स्थानिक बाजारपेठेत माहिती घेऊन ग्राहकांच्या व विक्रेत्याच्या प्रतिक्रीया घेतल्या असता विक्रेत्यांना या खाद्य तेलाच्या पॅकेजिंगवर अंकीत केलेल्या लाल ठिपक्याच्या कोडमुळे भंडावून सोडले आहे.
लाल ठिपक्यांच्या कोड मार्कमुळे यात मांसाहारी पदार्थाचा अंश तर नाही ना? असा संभ्रम ग्राहकांमध्ये निर्माण झाला आहे.
सुगुणा कंपनीच्या मदर डीलाईट या सोयाबीन खाद्य तेलाची स्थानिक बाजारपेठेत मोठी हिस्सेदारी असून 15 लिटर टब जार संबंधात हा प्रकार घडला आहे. जवळ्पास १० हजार टब जार एकट्या हिंगणघाट बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली असून शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने सुद्धा या संबंधात कारवाई केली आहे. भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या नियमांचे कंपनीने उल्लंघन केले असून कंपनीचे महाव्यवस्थापक जानकीरमण यांनी मात्र ही किरकोळ चूक असल्याचे सांगीतले आहे.
उपरोक्त खाद्यतेलाचा पुरवठा आमच्या कंपनीच्या वतीने करण्यात आला असून आमच्या वितरका कडून बाजारपेठेतील उपलब्ध तेलासंदर्भात होणाऱ्या कारवाई संबंधात जबाबदारी सुध्दा कंपनीचीच असल्याची त्यांनी माहिती दिली. कंपनीने चुकीचे निर्देश असलेला हा साठा बाजारपेठेतून परत मागविला असला तरी यातील बराचसा साठा बाजारपेठेत विकल्या गेला असल्याची माहिती आहे.