मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- किष्टापूर वेलगूर या गावावरून अक्षय जगन्नाथ कूळमेथे वय 22 व त्याचे सोबत मित्र हे दोघे दूचाकी वाहनाने भामरागड (इरपनार) ला नातलगाच्या घरी जात असताना अचानक तलवाडा जवळच्या ट्रनिंग त्याचा लक्षात न आल्यामूळे समोर असलेल्या पोल ला जबर धडक दिले असता त्याचा डोक्याला व छातीला जबर मार बसल्यामूळे तो दवाखान्यात मध्ये येताच त्याची प्राणज्योत मावळली. ही घटना समोर येताच कूळमेथे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले होते.
या घटनेची माहिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना कळताच डॉ.निसार हकीम व सरपंच खमनचेरू शानू व सरपंच मडावी गेर्रा हे व कार्यकर्ता दवाखान्यात प्रत्येक्ष भेट देऊन मयत कूंटूबाच्या सदस्यांना सांत्वना दिले व आर्थीक मदत केले आहे, मयत कुटुंब अजयभाऊंचे आभार व्यक्त केले आहे.