अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ११ मार्च:- प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र सावनेरच्या वतीने 8 मार्च ला जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी सुरेखा दीदी तसेच सारस्वत सेंट्रल पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल शिमला सिंग,जवाहर नेहरू विद्यालयाच्या पांडव मॅडम आणि अटाळकर मॅडम उपस्थित होत्या. यावेळी सुरुवातीला प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले.
यत्र नार्यस्तु पुज्यंते रमंते तत्र देवतः
अर्थात ज्या ठिकाणी नारीचा सन्मान केला जातो त्या ठिकाणी देवतांचा वास असतो. काळानुसार नारीला तर सन्मान मिळाला आहे.पूर्वी पुरुष प्रधान संस्कृती होती परंतु आता वेळ बदलली आहे आणि म्हणूनच स्वयं निराकार परमपिता परमात्मा यांनी ज्ञानाचा कळस नारीच्या डोक्यावर दिला आहे. नारी ही घराचा आधारस्तंभ आहे तीला वाटेल तर आपल्या घराला स्वर्ग बनवेल आणि वाटेल तर नर्क ही बनवू शकते.इतकी ताकद त्या महिलांमध्ये आहे आणि त्या शक्तीला ओळखून नारीने स्वतःच जीवन सुख आनी समृद्धीने संपन्न कराव असे उक्त उद्गार सेवा केंद्राच्या संचालिका सुरेखा दीदींनी आपल्या वक्तव्यात म्हटले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी महिलांसाठी विविध स्पर्धांचा आयोजन केलेलं होतं त्यात महिलांनी भरभरून उत्साह दाखविला तत्पश्चात सर्वांना प्रसाद वितरण करण्यात आले.