बौद्ध समाजावर होणारा अन्याय कुठं पर्यंत सहन करणार दोषीवर कठोर कारवाई न केल्यास रिपाईचे जिल्हाध्यक्ष गोपाल रायपुरे यांचा आंदोलन करण्याचा इशारा.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- येथून फुले, शाहू आंबेडकराच्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील चामोर्शी तालुक्यातील नवरगांव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील संविधान चौकाच्या नामफलकाला काही जातीयवादी लोकांनी हिरव्या रंगाचा कलर लावून काळे फासण्याचा प्रकार आज दि. १२ मार्चला पहाटेच्या सुमारास उघडकीस आला. त्यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ माजली आहे.
गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील संविधान चौकाच्या नामफलकाला रंग लाऊन काळे फासण्याचा प्रकार गावातील नागरिकांच्या लक्षात येताच या प्रकरणाची रिपोर्ट डायमंड वाकडे, प्रमोद गोवर्धन व इतर आंबेडकरी कार्यकर्त्यांनी पोटेगांव पोलीस स्टेशनला दिली. घटनेच गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस घटनास्थळी दाखल झाली.
संविधान चौकाच्या आजुबाजुला तिन कॅमेरे बसविले आहेत. पोलीसांनी फुटेज तपासले तर संविधान फलकाला रंग फासणारे जातीयवादी सापडतील जर कॅमेरे बंद करून ठेवले असतील तर यांची सर्वश्री जबाबदारी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यावर राहणार आहे. तश्या प्रकारची चौकशी पोलीसांनी करावी अश्या प्रकारची तक्रार आंबेडकरी समजच्या बांधवांनी पोलीस स्टेशन पोटेगांव येथे देण्यात आलेली आहे.
मागील एका वर्षापासून नवरगांव झेंडा व फलकाचा वाद सुरु आहे. झेंडा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक नावाचे नामफलक दोन्ही पार्टीच्या लोकांच्या साक्षीसे पोलीसा समश्य उपडून टाकण्यात आले व जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक गडचिरोली यांच्या साक्षीसे दोन्ही पार्टीच्या लोकांच्या समस्य संविधान चौक नावाने नामफलक रितसर लावण्यात आले होते. दिड महिण्याचा कालावधी जात नाही तोच आज पहाटे काही जातीयवादी लोकांनी अंधाराचा फायदा घेऊन फलकाला काळे फासण्याचा प्रकार उघडकीस आला. सदर प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी अन्यता रिपब्लिकन पार्टी तर्फे तिव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा रिपाईचे जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे, रिपाईचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर, कविश्वर झाडे, डायमंड वाकडे, प्रमोद गोवर्धन आदिनी दिलेला आहे.