श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बीड मधील 11 विद्यार्थ्यांना महाविद्यालयात झालेल्या कॅम्पस मुलाखतीद्वारे ट्रॅक्टर कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी मिळाली आहे. सध्याच्या स्पर्धेच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये संधी मिळणारे हे जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे.
दिनांक: ०५ मार्च रोजी आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय येथे VST Tillers Tractors या कंपनीचे कॅम्पस इंटरव्ह्यू चे आयोजन आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी कार्यकारिणी सदस्या डॉ. आदितीजी सारडा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. श्यामजी भुतडा सर यांच्या उपस्थितीत करण्यात आलेले होते. सदरील इंटरव्ह्यूकरिता कंपनीच्या वतीने श्री. नूर शेख ( State Head VST Tillers Tractors Ltd) व श्री. सुरेश पवार (Manager VST Tillers Tractors Ltd) उपस्थित होते.
सदरील विद्यार्थ्यांची निवड AFO (Assistant Field Officer )या पदाकरीता करण्यात आलेली असून विद्यार्थ्यांना रू.२५०००/- प्रतिमाह वेतन कंपनीने देऊ केले आहे. तसेच कंपनीसाठी असेच गुणवंत विद्यार्थी येत्या काळातदेखील आपल्या महाविद्यालयाकडून मिळावेत अशी अपेक्षादेखील श्री. नूर शेख सर यांनी व्यक्त केली.
संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या सॉफ्ट स्किल विकासावर भर: कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवडीची संख्या वाढण्याचे कारण म्हणजे संस्थेच्या संचालिका डॉ. आदितीजी सारडा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य श्री श्याम भुतडा सर यांनी घेतलेले विविध प्रशिक्षण कार्यक्रम, विद्यार्थ्यांना मुलाखतीचे तंत्र अवगत करण्यासाठी दिलेले प्रशिक्षण, गट चर्चा, ॲप्टिट्यूड टेस्ट, मॉक इंटरव्ह्यू, टेक्निकल आणि नॉलेज स्पर्धा आदिमधून विद्यार्थ्याचे सॉफ्ट स्किल विकसित केले गेले. आदित्य शिक्षण संस्था, बीड