शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे.
रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मंठा ता.१२:- आपण सत्तेत आहोत मतदार संघातील विकास कामांसाठी सतत संघर्ष करत असून शहरातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही शिवसेना तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांनी वार्ड क्रमांक १५ मधील सुगंधा नगर दलित वस्तीतील १० लक्ष रुपयांच्या सिमेंट रोडच्या उद्घाटन प्रसंगी येथे बोलतांना दिली. दलित वस्तीच्या विकासासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत व भविष्यातही राहू असा शब्द दलित वस्तीतील नागरिकांना यावेळी त्यांनी दिला.
या उद्घाटन प्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश गणगे महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख कासाबाई शिरगुळे दलित महिला आघाडी अध्यक्ष जयश्री पवार लिंबाजी बोराडे दलित आघाडी अध्यक्ष दिलीपराव हिवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलतांना तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे म्हणाले की, मंठा शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी आपण नेहमीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांना नेहमी पाठपुरावा करतो. राज्यात आपली सत्ता असल्याने मंठा तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास असून या कामांसाठी भरीव निधी खेचून आणला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास दीपक गायकवाड, अमोल वीरकर, महादेव उकंडे, पवन खरात, दत्तात्रय बोराडे, माऊली वायाळ, गोविंद घनवट, भागवत डाके, धम्मानंद वाघमारे, विलास बनसोडे, शुभम शेंडगे यांच्यासह परिसरातील नागरिक, महीला, युवक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.