अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील संत तुकडोजी वार्डातून एक चोरीची खळबळजनक घटना समोर आली आहे. घरी कुणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करुन घरातील कपाटातील 10 हजार रुपये नगदी व 1 लाख 38 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
संत तुकडोजी वार्ड येथे राहणारे सुनिल प्रभाकर श्रीरामे हे त्यांचे घराला कुलूप लावून सासुरवाडी भिवापूर येथे परिवारासह गेले होते. त्यांचे घराचे बाजुला राहणारे शेजारी निखिल वाघमारे यांनी फोन करुण सांगितले की तुमच्या घराचे दाराला लॉक लावुन नाही. या सुचणे वरून त्यांनी घरी येऊन पाहणी केली असता घरा बाहेरील दाराचे कुलूप तोडलेले दिसुन आले व घराचे आतमध्ये जावुन पाहीले असता लोखंडी कपाट उघडे – दिसले आणि कपाटाला लॉकरची चाबी लावुन दिसली. कपाटाचे लॉकरमध्ये ठेवुन असलेले 10 हजार रुपये नगदी आणि 1 लाख 38 हजार रुपये किंमतीचे 46 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 48 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरुन नेला असल्याचे आढळले.
घरात चोरी झाल्याची तक्रार सुनिल प्रभाकर श्रीरामे हिंगणघाट पोलिस स्टेशन येथे दिली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.