पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या प्रमिकेला जबर मारहाण केली. त्यानंतर त्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात न नेता आईच्या घरी आणून सोडले. आपल्या मुलीची परिस्थिती बघून आईने या तरुणीला तडकाफडकी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी आईने दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. शहबाज उर्फ समीर फैतुल्ला शेख वय 27 वर्ष, रा. शांतीनगर असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शहबाज उर्फ समीर फैतुल्ला शेख हा एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो. त्याचे यशोधरानगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणीशी मागील 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एकमेकांसोबत राहत होते. दरम्यान कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत 24 फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यात भांडणात शहबाज याने तरुणीला हाताबुक्क्यांनी मारहाण केली. यात तिच्या पायाला जबर दुखापत झाली.
त्यानंतर शहबाज याने तिला परिसरातील डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले. दरम्यान दुखापत गंभीर असल्याने डॉक्टरांनी तरुणीला दुसऱ्या रुग्णालयात उपचारास नेण्यास सांगितले. परंतु आरोपी शहबाजने उपचारासाठी पैसे नसल्याने तिला तिच्या आईकडे सोडले. तिच्या आईने तिला उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल केले असता तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
उपचारासार उशीर झाल्याने तरुणीचा मृत्यु झाल्याची चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे मृत तरुणीचा आईने आरोपी शहबाजविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मृतक तरुणीचा आईने दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी शहबाजविरुद्ध कलम 304 नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.