भंडारा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा:- भंडारा शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील शासकीय बीएड महाविद्यालयात कार्यरत असेलया एका प्राध्यापकानं आपल्याच सहकारी महिला प्राध्यापिकेचा विनयभंग केल्याच्या घटनेन संपूर्ण भंडारा जिल्हा हादरला आहे. भावी शिक्षक घडविणाऱ्या पवित्र महाविद्यालयातच हा संपूर्ण प्रकार घडल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. पिडीत महिला प्राध्यापकाच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी संशयित आरोपी प्रध्यापकाविरुद्ध कलम 354, 506 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
शासकीय बीएड महाविद्यालयात कार्यरत असेलया एका प्राध्यापकानं आपल्याच सहकारी महिला प्राध्यापिकेचा विनयभंग केल्याची घटना 14 मार्चला दुपारच्या सुमारास महाविद्यालयाच्या स्टाफची बैठक सुरू असताना घडल्याची माहिती पिडीत प्राध्यापकानं दिली असल्याने हा प्रकार उघड झाला.
विदर्भातील एकमेव शासकीय बीएड महाविद्यालय भंडारा शहरात आहे. दरम्यान या महाविद्यालयात कार्यरत महिला सहायक प्राध्यापिकेचे पती हे मिझोराम येथे आर्मीत देश सेवा करीत आहे. तर पीडित महिला प्राध्यापिका या त्यांच्या एका मुलीसह भंडाऱ्यात राहतात. 14 मार्चच्या दुपारी महाविद्यालयाच्या स्टॉपची बैठक सुरू असताना हा प्रसंग घडल्याची माहिती पिडीतेने स्वतः पत्रकार परिषदेत सांगितली आहे.
या घटनेतील प्राध्यापकाने पीडित महिला प्राध्यापिकेच्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. प्राध्यापकाच्या अचानक अशा वागण्याने पीडित महिला भांबावली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगून तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सध्या भंडारा पोलीस करीत आहे. मात्र या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
पिडीत महिला प्राध्यापकाच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी संशयित आरोपी प्रध्यापकाविरुद्ध कलम विविध कलमान्वये गुन्हा दाखल असून. पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखली पोलीस करत आहे.