अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील एका पाठोपाठ एक नेते भाजप मध्ये प्रवेश घेत आहे. आणि यामुळे भाजपाला दिवसे दिवस बळकटी मिळत आहे. तर दुसरी कडे तालुक्यात मजबूत असलेल्या राष्ट्रवादी (शरद पवार) ची शक्ती घटत आहे. आता परवाच राष्ट्रवादीचे शहर प्रमुख यांनी पक्ष सोडून शिवसेना (उबाठा) मध्ये प्रवेश घेतला. या बातमीची शाई वाळत नाही तोच राष्ट्रवादीचे युवा नेते रोशन डागा यांनी देखील पक्षाला रामराम करत भाजप मध्ये प्रवेश घेतला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या पक्षांतर मुळे राष्ट्रवादी काँग्रेसची शक्ती घटत आहे, तर भाजपा ची ताकत वाढत आहे. डागा परिवार कित्येक वर्षा पासून राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळून होते. पण आता या प्रवेश मुळे राष्ट्रवादी काँग्रेसची कुठेतरी मागे येत असल्याचे दिसून येत आहे.
आमदार समिर कुणावर यांच्या कार्यालयात या प्रवेश सोहळ्याच्या वेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर, शहर अध्यक्ष भूषण पिसे, विधानसभा प्रमुख सनी बासनवार, अमोल त्रिपाठी, अनुकूल कोचर, भूषण आश्टणकार, गौरव खिराळे, संकेत नगराळे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.