उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- येथून एक अपघाताची घटना समोर आली आहे. शेतातून घरी जातांना माखनचोर जवळ रुग्णवाहिका चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माखनचोर जवळील शेतातून घरी परतणाऱ्या राजेश डोईफोडे यांना मागून येणाऱ्या रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिली. या अपघातात राजेश डोईफोडे यांचा जागीच मृत्यू झाला. सदर रुग्णवाहिका ही ओझोन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ची असल्याचे माहिती समोर आली आहे. रुग्णवाहिका चालकाकडे परवाना नसल्यामुळे तो दारूच्या नशेत रुग्णवाहिका चालवत असल्याचे समोर आल्याने लोकांनी रुग्णवाहिका चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.