प्रत्येक वाढदिवसाला करणार तथागताच्या मुर्तीच दान: डॉ.किशोर त्रिभुवन वंचित बहुजन आघाडी जालना जिल्हा महासचिव
रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मंठा:- तालुक्यातील केंधळी येथील डॉ. किशोर त्रिभुवन यांनी आपल्या मुलाच्या प्रथम वाढदिवसानिमित्त केंधळी गावातील बौद्ध विहारांमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची स्थापना आज करण्यात आली. या मूर्तीची स्थापनेची सुरुवात गावामध्ये धम्म रॅली काढून विहारामध्ये तथागतांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आलं.
ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो आणि या समाजाचं काहीतरी देणं लागतं याच उद्देशाने वंचित बहुजन आघाडी जालना जिल्हा महासचिव डॉ. किशोर त्रिभुवन यांनी आपल्या मुलाचा प्रथम वाढदिवस हा एक आगळावेगळा व आयुष्यभर लक्षात राहील असा अनोखा वाढदिवस तथागताची मूर्ती केंधळी गावातील विहारांमध्ये स्थापन करून केला.
यावेळी बोलताना डॉ. किशोर त्रिभुवन म्हणाले की, माझ्या मुलाच्या म्हणजेच संविधान बाळाच्या प्रत्येक वाढदिवसाला मी विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची दान हे मंठा तालुक्यातील ज्या गावात मूर्तीची आवश्यकता आहे त्या गावात मूर्तीदान संविधान बाळाच्या प्रत्येक वाढदिवसाला देणार आहे.
या मूर्ती स्थापनेच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके , जिल्हा सदस्य, गुलाब बचाटे, भारत उघडे, सुभाष जाधव तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी मंठा, रविंद्र भदर्गे परतूर तालुका अध्यक्ष राहूल नाटकर परतूर शहर अध्यक्ष अंबादास खरात महासचिव मंठा, पुरुषोत्तम देशमुख सल्लागार, नारायण ढाकरगे उपाध्यक्ष मंठा, आशिष मोरे युवा नेते वंचित बहुजन आघाडी तथा तालुका सचिव मंठा, परमेश्वर मानकर विद्यमान सरपंच पांगरी गोसावी, महादेव गोरे, एकनाथ मानकर प्रवक्ता मंठा वंचित बहुजन आघाडी, सुधाकर खरात तालुका उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, सुनील कामिटे, व शेकडो धम्मबांधव भगिनी या कार्यक्रमाला पांढरे शुभ्र वस्त्र परीधारण करून उपस्थित होते.