मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा येथे होळी पौर्णिमेनिमित्त होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथेप्रमाणे होळीची पूजा करून होलिकामातेला मनोभावे वंदन केले. तसेच होळी पेटवून समाजातील वाईट गोष्टींचा नाश करून सर्वांना सुख समाधान मिळावे एवढेच मागणे होलिकामातेकडे मागितले. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्षा निवासस्थानी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होळी पौर्णिमा आणि धुलीवंदनाच्या निमित्याने राज्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.