आशिष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. वर्धा जिल्हाचे विद्यमान खासदार तसेच यावेळी पुन्हा लोकसभा निवडणूक लढणारे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामदास तडस यांचा फोनवरील संवाद चर्चेत आला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हात खळबळ माजली आहे.
पारडा येथील प्रवीण महाजन यांनी भाजपा चे खासदार रामदास तडस यांच्यासोबत बोलतांना त्यांना शेतकरी प्रश्नावर प्रश्न विचारण्यात आले. या चर्चेची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. सरकार शेतमालाची आयात करून देशातील मालाचे भाव पाडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे. तेंव्हा याबद्दल सरकारला जाब का विचारात नाही, असे त्यांना विचारले असता उत्तर देतांना खासदार रामदास तडस म्हणाले की हे प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले पाहिजे. पण आता विरोधकाच राहिले नाही.
त्यानंतर प्रवीण महाजन यांनी खासदार रामदास तडस यांना विचारतात की मग तुम्हीच का प्रश्न करीत नाही. यावर रामदास तडस म्हणाले की विचारले तर मंत्री घरी बसा म्हणतात. यावर महाजन आश्चर्य व्यक्त करतात.
ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर जिल्हातील विरोधी पक्षाच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. या क्लिप बदल बोलतांना खासदार रामदास तडस म्हणाले की ही बनावट व जुनी क्लिप आहे.