ठाणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे :- मध्यवर्ती कारागृह ठाणे ई-ग्रंथालय उदघाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुस्तके आपल्या मनावर खोलवर परिणाम करतात आणि आपली मनस्थिती सुधारण्यासाठी मदत करतात. पुस्तके ही व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त ठरतात. जीवनात चांगले करण्याची प्रेरणा देतात व व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणतात. याच उदात्त हेतूने कारागृहातील बंद्यांना देखील त्यांच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी त्यांच्याध्ये चांगल्या गुणांची जोपासणा होण्यासाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांना पारंपारीक ग्रंथालयाच्या माध्यमातून मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दु इत्यादी भाषेतील कथा, कादंबरी, मनोरंजन, ऐतिहासिक, तत्वज्ञान, कायदेविषयक अशा विषयांची 5000 पर्यंत पुस्तके सध्यस्थितीत ठाणे मध्यवर्ती कारागृहातील ग्रंथालयात उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.
काळानुरुप भौतीक साधनामध्ये मध्ये आधुनिक तंत्राज्ञानामुळे प्रत्येक क्षेत्रात क्रांती झालेली आहे. त्याच प्रमाणे ग्रंथालय देखील आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने ई-ग्रंथालय झालेली असून ई- ग्रंथालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पुस्तके वाचकांना उपलब्ध होत आहेत. या तंत्राज्ञानाची कारागृहातील बंद्यांना देखील लाभ होऊन बंद्यांना जास्तीत जास्त पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञानसाठा उपलब्ध व्हावा या उदात्त हेतूने अमिताभ गुप्ता अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे, यांचे संकल्पनेतून कारागृहातील बंद्यांना ई- ग्रंथालय सुरू करण्यात येत आहे . ई- ग्ग्रंथालयाच्या माध्यमातून पी.डी.एफ.स्वरुपात पुस्तके उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे.
दि.22 मार्च रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांकरीता सुरु करण्यात आलेले “ई-ग्रंथालय ” चे उदघाटन योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक दक्षिण विभाग मुंबई यांचे शुभहस्ते पार पडले. सदर कार्यक्रमाच्या वेळी श्रीमती राणी भोसले अधीक्षक ठाणे मध्यवर्ती कारागृह श्री. डी.टी. डाबेराव, उपअधीक्षक व श्री.के.पी.भवर वरिष्ठ तुरुंगाधिकारी, सत्संग फाउंडेशनचे समन्वयक श्रीमती प्राची जोशी तसेच इतर अधिकारी/कर्मचारी व बंदी बांधव उपस्थित होते.
या ई -ग्रंथालय मध्ये संगणकाच्या माध्यमातून प्राथमिक स्वरुपात मराठी/ हिंदी/ इंग्रजी या भाषेतील 950 ई पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. बंद्यांच्या मागणीनुसार /आवडी नुसार ई- पुस्तके बंद्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ई-ग्रंथालय उदघाटन कार्यक्रम प्रसंगी कारागृह उपमहानिरीक्षक यांनी बंद्यांना ई-ग्रंथालयाचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन केले.