अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट: ब्रिलीयन्ट स्कूल हिंगणघाट येथे उन्हाळी शिबिरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी डाँ. उमेश तुळसकर यांनी वृक्षारोपण का करावे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्याचप्रमाणे डाँ. नयना शिरभाते यांनी सृष्टी संवर्धनचा संदेश देत रोपांची दैनंदिन निगा कशी राखावी हे समजावून सांगितले. वृक्षारोपण करताना विध्यर्थ्यांचा उत्साह बघण्यासारखा होता.
या कार्यक्रमामध्ये उन्हाळी शिबिरातील सर्व विद्यार्थी व ब्रिलीयन्ट स्कूलच्या शिक्षिका कल्याणी झिलपे, नीता उराडे, ऋजुता पतंगे, सुनल काळे, राणी गलांडे, वंदना राऊत, उज्वला सातपुते, प्रतिभा लाजूरकर, पायल खोडे व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सहभाग होता.